Wednesday 19 September 2012

अस्थायी वै.अ. ना बसणार निश्चित धक्का! सुखद की दुखद?

                  नुकतीच नवीन आरोग्यासचीवासोबत  माग्मोची बैठक झाली .त्यात अस्थायीचे प्रतीनिधी  असतील तर त्यांना  सचिवांची भूमिका आणि अर्थ किती समाजला देव जाणे !
 अस्थायी गट -ब वै.  मधील काहीं लोकांची भूमिका त्यांचे आरोप प्रत्यारोप , माग्मोला त्यातल्या टीम ला केंव्हा केंव्हा तर प्रत्यक्ष माग्मो अध्यक्ष हि त्यांच्या अपरिपक्व टीका टिपणीतून  सुटले नाहीत .ह्यावर सगळ्या वरीष्ठ  वै. अ. ,अधिकारी ,संघटनेतील पदाधिकारी, इतर संवर्गातील अधिकारी लक्ष ठेऊन होते . खासगीत हि सर्व मंडळी अस्थायींच्या ह्या वागण्याने दुखावल्याचे  सांगत होती. अस्थायीनी  स्वताच आपल्यात व प्रमुख प्रवाहात  विनाकारण दरी निर्माण करून घेतलीय.
            बी.ए.एम.एस. लोकांना मुख्य प्रवाहात मिळणाऱ्या  दुय्यम वागणूकीची दुखरी ठसठसती  बोच व  त्याचा राग  कुठेही  व्यक्त करून पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. अश्याने इतर वै. अधिकारी आणि ह्यांच्यात दरी  निर्माण होतेय आणि हे हिताचे नाही ,
ही  भंगलेले मने; खोलवर दुखावलेले मने मनातून एकदुसऱ्यासाठी किती  पुढे येतील हे बघण्यासारखे आहे.अश्या सर्व पार्श्वभूमीवर धक्कादायक परिणाम समोर आल्यास  आश्चर्य वाटायास नको!मग ते सुखद हि असतील हि किंवा धक्कादायक गर्तेत न्हेणारे  हि असू शकतील हे कालच जाणे !!

 विस्तृत  विवेचन  मुद्देनिहाय  कारणमीमांसा सहित पुढील अंकात .....